'झेलेन्स्कीला सांगा, मी त्यांना मारीन..' शांतता प्रस्तावानंतर पुतीन संतापले

putin
putin Sakal

मागील एक महिन्यापासू रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, शेकडो रशियन सैनिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) जगातील कोणत्याही नेत्याचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे युक्रेनमध्ये रक्तरंजित खेळ सुरूच आहे. अखेर पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणला जातोय. मात्र, अद्याप दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांसमोर ठाकलं आहे.

रशिया अद्याप युक्रेनच्या शहरांवर हल्ले चढवत असून हवाई हल्ले देखील सुरूच आहेत. दरम्यान, शांततादूत रोमन अब्रामोविच यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे पत्र सादर केले. यामध्ये युद्धविराम आणि शांतता कायम राखण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, पुतिन यांचा युक्रेनवर राग अद्याप कायम आहे. झेलेन्स्कींना सांगा की मी त्यांना मारीन, असं पुतिन म्हणाल्याचं समोर आलंय.

putin
रशिया घालणार मित्र नसलेल्या देशांच्या प्रवेशावर बंदी!

द टाईम्सच्या वृत्तानुसार, युक्रेनकडून पुतीन यांना हस्तलिखित नोट देण्यात आली. युक्रेनच्या युद्ध समाप्तीच्या अटींचे यामध्ये तपशीलवार वर्णन केले आहे. यापूर्वी, रशियन अलिगार्क रोमन अब्रामोविचने युद्धाचा शेवट करण्यासाठी आवश्यक वाटाघाटींमध्ये मदत करण्यास पुढाकार घेतला होता. युक्रेनच्या विनंतीनंतर त्यांनी ही प्रक्रिया तडीस नेण्याचं स्वीकारलं होतं. ते चेल्सी या फुटबॉल क्लबचे मालक आहेत. सुरुवातीपासून इस्तांबूल, मॉस्को आणि कीव्ह यांच्या राष्ट्राध्यक्षाचे संदेशांची देवाणघेवाण त्यांच्यामार्फत सुरू आहे.

शांतता प्रस्तावाआधीच विषप्रयोग?

युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच हे या युद्धासंदर्भातच मार्च महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेले होते. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने युक्रेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचा ते देखील एक भाग होते. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांवर विषप्रयोग झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबद्दलचं वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलनं दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com