esakal | बंगालमध्ये २१८ जागांकडे सर्वाधिक लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

कोलकता : भिंती रंगविणे हे पश्‍चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचे ठळक वैशिष्ट्य असून कलाकार या कामात मग्न झाले आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या दरम्यान आठ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राज्यातील निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वांत दीर्घकालीन निवडणूक ठरणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे.

बंगालमध्ये २१८ जागांकडे सर्वाधिक लक्ष

sakal_logo
By
श्‍यामल रॉय

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या दरम्यान आठ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राज्यातील निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वांत दीर्घकालीन निवडणूक ठरणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे. राज्यातील एकूण २९४ जागांपैकी १४ जिल्ह्यांमधील २१८ जागा या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्यावरच अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.

सर्जरीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला डॉक्टर; जाणून घ्या, पुढं काय झालं?

राज्यात सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस या आघाडीला फारसे भवितव्य दिसत नाही. मात्र, आधी २०१६ मधील विधानसभा निवडणुकीत आणि नंतर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वांचे लक्ष मात्र तृणमूल,  भाजपकडेच आहे. ‘बंगालची मुलगी’ म्हणून तृणमूलने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रचार सुरु केला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर केंद्रीय नेते वारंवार राज्यात चकरा मारत आहेत, ‘सोनार बांगला’चे आश्‍वासन देत आहेत. ‘परिबोर्तन’ यात्रा काढून त्यांनी आधीपासूनच राजकीय वातावरण तापवले आहे. बंगालमध्ये सत्तेवर येण्यासाठी तृणमूल आणि भाजपला २१८ जागा अतिशय महत्त्वाच्या आहेत.

'लिव्ह इन'मधील जोडप्यात लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार कसा? - सुप्रीम कोर्ट

हे जिल्हे महत्त्वाचे 
वीरभूम, पूर्व वर्धमान, पश्‍चिम वर्धमान, हुगली, हावडा, पूर्व मिदनापूर, पश्‍चिम मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया, नादिया, उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा, कोलकता हे जिल्हे महत्त्वाचे आहेत. पश्‍चिम मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया जिल्ह्यांचा समावेश असलेला जंगलमहाल विभाग आणि झारग्राम विभागात एकूण ४० जागा आहेत. उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा आणि नादिया या जिल्ह्यांमध्ये २० जागा असून या भाजप, तृणमूलबरोबरच माकप आणि काँग्रेससाठीही महत्त्वाच्या आहेत. मात्र, पूर्व मिदनापूर, हावडा आणि हुगळी या जिल्ह्यांमधील ८६ जागा याच निर्णायक ठरतील.

Edited By - Prashant Patil

loading image