सर्जरीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला डॉक्टर; जाणून घ्या, पुढं काय झालं?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 1 March 2021

ऑपरेशन सुरु असताना एका सर्जनने चक्क कोर्टाच्या सुनावलीला हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वॉशिंग्टन- ऑपरेशन सुरु असताना एका सर्जनने चक्क कोर्टाच्या सुनावलीला हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका डॉक्टरने ऑपरेशन करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टाच्या सुनावणीला उपस्थिती लावली. ही सुनावणी ट्र्रॅकिक नियमांच्या उल्लंघनासंबंधी होती. प्लॉस्टिक सर्जन डॉ. स्कॉट ग्रीन गुरुवारी ऑपरेशन थेटरमध्ये सेक्रामेंटो सुपीरियर कोर्टात डिजिटल स्वरुपात उपस्थित झाले होते. 

कोर्टात उपस्थित होण्यादरम्यान ते एका रुग्णाचे ऑपरेशन करत होते. पाठीमागून मेडिकल यंत्रातून बीप-बीप असा आवाज येत होता. यावेळी कोर्टाच्या क्लार्कने म्हटलं की, हॅलो, डॉक्टर ग्रीन, तुम्ही सुनावणीसाठी उपलब्ध आहात का? असं दिसून येतंय की तुम्ही सध्या ऑपरेशन थेटरमध्ये आहात. यावेळी डॉ. ग्रीन उत्तर देतात की, मी ऑपरेशन थेटरमध्ये आहे, पण मी सुनावणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कार्यवाही सुरु करु शकता.

मुंबईतील 'ब्लॅकआऊट'मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक...

कोर्टाच्या सुनावणीदरम्यान डॉ. ग्रीन ऑपरेशन करत होते. लिंक जेव्हा सुरु झाली त्यावेळी न्यायाधीशांनी डॉ. ग्रीन यांना ऑपरेशन थेटरमध्ये पाहून सुनावणी सुरु करण्यास टाळाटाळ केली. तसेच ऑपरेशन पूर्ण करण्याचा सल्ला दिला. पण, डॉ. ग्रीन यांनी आपल्यासोबत आणखी एक डॉक्टर असल्याचं म्हणत सुनावणी पुढे सुरु करण्यात सांगितलं. 

म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18...

न्यायाधीशांनी म्हटलं की, अशा स्थितीत सुनावणी सुरु करणं योग्य ठरणार नाही.  कोर्टाने डॉ. ग्रीन यांना पुढची तारीख दिली. तसेच त्यावेळी डॉ. ग्रीन ऑपरेशन थेटरमध्ये राहणार नाहीत अशी आशा व्यक्त केली. लोकांना तंदुरुस्त आणि जीवंत ठेवणे महत्त्वाचे आहे, असं न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी डॉ. ग्रीन यांनी माफी मागितली आहे. असे असले तरी मेडिकल बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor appears in court video call while performing surgery