निपाणीत 4 वाजेपर्यंत सर्वाधिक 65 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

जिल्ह्यात आज (ता.12) दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वाधिक 65 टक्के मतदान निपाणीत झाले. त्यापाठोपाठ चिक्कोडी सदलग्यात 64.2 टक्के मतदान झाले आहे.

बेळगाव : जिल्ह्यात आज (ता.12) दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वाधिक 65 टक्के मतदान निपाणीत झाले. त्यापाठोपाठ चिक्कोडी सदलग्यात 64.2 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव उत्तरला 53 टक्के, बेळगाव दक्षिण 44.74 टक्के, बेळगाव ग्रामीण 51.7 टक्के, खानापूर 52.80 टक्के मतदान झाले. 

निपाणीत 64.42 टक्के, चिक्कोडी सदलगा 64.2 टक्के, अथणी 58.33 टक्के, कागवाड 57.5 टक्के, कुडची 51 टक्के, रायबाग 53 टक्के, हुक्केरी 56.69 टक्के, अरभावी 51.50 टक्के, गोकाक 55.10 टक्के, यमकनमर्डी 59.13 टक्के, बैलहोंगल 49.51, कित्तूर 46.75 टक्के, सौदत्ती 58.25 टक्के, रामदूर्ग 53.6 टक्के मतदान झाले आहे.

Web Title: The highest voting turnout in Nipani of 65 percent till 4 pm