कार्यक्रम आटोपून परतत असताना भीषण अपघात; 6 ठार, 14 जण गंभीर जखमी

Truck-Tractor Accident
Truck-Tractor Accidentesakal
Summary

कार्यक्रम आटोपून परतत असताना कोडोहर्डी-जोबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) गरियाबंद जिल्ह्यात (Gariaband District) झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 हून अधिक लोक जखमी झालेत. ट्रकनं ट्रॅक्टरला (Truck-Tractor Accident) जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना गरियाबंद जिल्हा रुग्णालयात (Gariaband District Hospital) पाठवण्यात आलं असून 14 गंभीर जखमींना रायपूरला रवाना करण्यात आलंय. अपघातात मृत पावलेले एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येतंय.

कोतवालीचे प्रभारी सत्येंद्र श्याम (Satyendra Shyam) यांनी सांगितलं की, जिल्हा मुख्यालयापासून 8 किमी अंतरावर असलेल्या कोडोहर्डी आणि जोबा गावाजवळ हा अपघात झालाय. या अपघातात चंदाबाई (20), वडील दुष्यंत ध्रुव, हिराबाई (65), प्रेमाबाई (50), कोश (50), कौशल्या ध्रुव (36) आणि रमंतीनबाई (40) यांचा मृत्यू झालाय. ट्रॅक्टर-ट्रॉलीमधील 20 हून अधिक जण जखमी झाले असून, 14 गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर रायपूरला रवाना करण्यात आलंय. यात ट्रकचा चालकही गंभीर जखमी आहे. या जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Truck-Tractor Accident
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देणार?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमी मजरकट्टा गावातील रहिवासी आहेत. मजरकट्टाचे माजी सरपंच दुष्यंत ध्रुव यांच्या नातेवाईकाचा मंगळवारी मोहलाई गावात कार्यक्रम होता. त्यामुळं ट्रॅक्टरमधून 40 जण जात होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपून परतत असताना कोडोहर्डी आणि जोबा गावाजवळ भरधाव ट्रकनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आणि ही दुर्घटना घडली. रात्री एसपीसह अन्य पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com