
'गांधी घराण्याला काँग्रेसमधून काढून टाकलं, तर काँग्रेस मजबूत होऊ शकणार नाही.'
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देणार?
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला; पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) भाजपला (BJP) जोरदार टक्कर देईल, असा विश्वास रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसनं एकदिलानं काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला तगडं आव्हान देऊ शकतो, असंही प्रशांत किशोर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हंटलंय. यूपी, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला.
हेही वाचा: योगींच्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 40 हून अधिक मंत्री घेणार शपथ
दरम्यान, CWC बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पक्षातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि पक्षात बदल घडविण्यासाठी अधिकार देण्यात आलेत. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा संधी आहे. काँग्रेस एकसंध राहिल्यास भाजपला तगडं आव्हान देऊ शकतो. सध्या भाजप ताकदवान पक्ष बनलाय. पण, तरीही पूर्व आणि दक्षिण भारतात त्यांना संघर्ष करावा लागतोय. कारण, या प्रदेशांतील सुमारे 200 जागांपैकी 50 जागाही भाजपला मिळू शकलेल्या नाहीत. यामध्ये बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.
हेही वाचा: निधनाआधी शंकरराव कोल्हेंनी गृहमंत्र्यांना पाठवलं होतं 'पत्र'
कोणत्याही पक्षाला विशेषत: काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय बनायचं असेल, तर त्याची आतापासूनच रणनीती आखली पाहिजे. तसेच गांधी घराण्याला काँग्रेसमधून काढून टाकलं, तर काँग्रेस मजबूत होऊ शकणार नाही, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.
Web Title: Congress Could Challenge The Bjp In The 2024 Lok Sabha Election Political Strategist Prashant Kishor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..