Hijab : असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर आरोप करीत विचारला हा प्रश्न

Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiAsaduddin Owaisi

कर्नाटकातील कॉलेजमध्ये हिजाबवरून (Hijab Controversy ) सुरू झालेल्या वादाने मोठे रूप धारण केले आहे. याप्रकरणी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी भाजपच्या लोकांना भडकावण्याचे काम करीत असल्याचे म्हटले आहे. संसदेत टोपी घालता येत असेल तर शाळा कॉलेजमध्ये हिजाब घालायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Hijab Controversy In Karnataka)

मी माझ्या संविधानाबद्दल बोलत आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल बोलत आहे. जर आपण टोपी घालून संसदेत जाऊ शकतो तर मुलगी हिजाब घालून कॉलेजला का जाऊ शकत नाही. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपने याच बळावर विजय मिळवला आहे. मूलतत्त्ववाद येतो कुठून? तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनीही कान व डोळे बंद केले आहेत, असेही ओवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. (Asaduddin Owaisi's allegations against BJP)

Asaduddin Owaisi
यशोमती ठाकूर यांचे नरेंद्र मोदींना उत्तर; म्हणाल्या...

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी येथील महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब (Hijab Controversy) परिधान केल्यामुळे वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर मुली धरणावर बसल्या. कॉलेजने काहीही न ऐकल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com