हिज्बुलचा म्होरक्या सलाउद्दीनच्या मुलाला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

शकील हा सईद सलाउद्दीन याचा दुसरा मुलगा आहे. सलाउद्दीनचा पहिला मुलगा सईद शाहिद युसूफ हा पूर्वीपासूनच तिहार कारागृहात आहे. त्याच्यावरही दहशतवादी गटांना आर्थिक पुरवठा केल्याचा आरोप आहे.

श्रीनगर : दहशतवादी गटांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मुलाला राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) बुधवारी रात्री अटक करण्यात आली.

श्रीनगरमधील रामबाग भागातून सईद सलाउद्दीनचा मुलगा सईद शकील अहमद याला अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्लीला आणण्यात येणार आहे. त्याठिकाणी सईद शकील अहमद या प्रकरणी विविध तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येईल. 

शकील हा सईद सलाउद्दीन याचा दुसरा मुलगा आहे. सलाउद्दीनचा पहिला मुलगा सईद शाहिद युसूफ हा पूर्वीपासूनच तिहार कारागृहात आहे. त्याच्यावरही दहशतवादी गटांना आर्थिक पुरवठा केल्याचा आरोप आहे. काश्मीरमधील राजकीय घडमोडींनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शकील हा शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआयएमएस) मध्ये काम करतो.

Web Title: hijbul chief salauddin s son arrested by NIA