पेट्रोल, डिझेलची दरवाढ तूर्तास टळली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारी होणार असलेली नियोजित दरवाढ तूर्तास टळली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.26 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.78 रुपये दरवाढ करण्यात येण्याची शक्यता होती. नोटाबंदीमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेल्या संतापात दरवाढीचे तेल ओतले जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) या कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 E16 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या भावाचा आढावा घेऊन हे बदल केले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढ वाढले आहेत. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारला आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.26 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलटर 1.78 रुपये दरवाढ होणे अपेक्षित होते. यात स्थानिक उपकर धरण्यात आलेले नाहीत. याआधी 1 डिसेंबरला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे आणि डिझेलच्या दरात 12 पैसे वाढ करण्यात आली होती. त्याआधी 16 नोव्हेंबरला पेट्रोल 1.46 रुपये आणि डिझेल 1.53 रुपये दरवाढ करण्यात आली होती.

राजकीय हेतूने दरवाढ लांबणीवर
उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अधिवेशन सुरू असून, आता दरवाढ झाल्यास आधीच सुरू असलेल्या वादात तेल ओतले सारखे होईल. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सरकारची सर्व बाजूंनी विरोधक कोंडी करीत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्यांना आणखी एक मुद्दा मिळेल. तसेच, नोटाबंदीमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला रोष या दरवाढीमुळे आणखी वाढेल. ही दरवाढ होणारच असून, दोन-तीन दिवसानंतर ती होण्याची शक्‍यता आहे.
 
Web Title: hike in petrol, diesel prices postponed