हिलरी क्लिंटन टाकणार ईशा अंबानीच्या लग्नात अक्षता 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. एक फोटोग्राफरने त्यांचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या कन्येच्या सोहळ्याला जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह लग्नसोहळ्यासाठी पोचले आहेत. तसेच बॉलिवूडमधील करण जोहर, ए. आर. रहमान,  विद्या बालन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय तसेच प्रियांका चोप्रा-निक यांची जोडी देखील विवाह सोहळयाला हजेरी लावण्यासाठी उदयपूरमध्ये पोचली आहे. शिवाय काही बॉलिवूड कलाकारांकडून विवाह सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. 

Web Title: Hillary Clinton arrives in India for Isha Ambanis wedding