Congress: 'बहिण-भावाचं पटत नाहीये, म्हणून दीड महिना होऊनही…''; राहुल-प्रियंकाबाबत भाजप नेत्याचा दावा

himachal assembly election 2022 anurag-thakur congress priyanka gandhi and rahul gandhi bharat jodo yatra
himachal assembly election 2022 anurag-thakur congress priyanka gandhi and rahul gandhi bharat jodo yatra Team eSakal

प्रियंका गांधी यांच्या हिमाचल दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस जनतेची दिशाभूल करणारा पक्ष असून, काँग्रेस खोट्याचे राजकारण करते असेही ते म्हणाले आहेत. यासोबतच केंद्रातील मोदी सरकारने सुशासन आणि प्रामाणिकपणाने हिमाचलच्या लोकांसाठी अनेक कामे केल्याचा दावाही त्यांनी केला.

हिमाचलच्या हमीरपूरमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भाऊ-बहीण (राहुल गांधी आणि प्रियंका गांधी) यांच्यात सर्वकाही ठिक नाहीये, त्यामुळे भारत जोडी यात्रेला दीड महिना झाला, पण बहीण (प्रियांका गांधी) या यात्रेत सहभागी झाल्या नाहीत. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधी यांना तुकडे-तुकडे गँगसोबत यात्रा करण्यास सांगितले आहे. याशिवाय हिमाचलमध्ये पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कांगडामध्ये भाजपवर निशाणा साधत प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी (४ नोव्हेंबर) सांगितले की, काँग्रेस कार्यकर्ते गावोगावी जात आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते बंडखोरी करण्याचा प्रयत्नात आहेत. काँग्रेसचे सरकार येणार हे त्यांना माहीत आहे, असे म्हटले आहे.

himachal assembly election 2022 anurag-thakur congress priyanka gandhi and rahul gandhi bharat jodo yatra
Gulabrao Patil: सुषमा अंधारेंच्या सभेला जळगावात परवानगी नकारली; गुलाबराव पाटील म्हणाले, 'हे नवीन पार्सल…'

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठ, आयआयटीसह गावोगावी शाळा बांधाले आहेत, असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. हिमाचलमध्ये काँग्रेस पुन्हा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, वन रँक, वन पेन्शन' देता येत नाही, पण अग्निवीर योजना येऊ शकते, ज्याद्वारे लष्कराला कंत्राटावर देता येईल. तुम्ही तुमच्या मुलांना ४ वर्षांसाठी सैन्यात पाठवणार आणि मग ४ वर्षांनी ते कुठल्यातरी कार्यालयात कर्मचारी होतील.

himachal assembly election 2022 anurag-thakur congress priyanka gandhi and rahul gandhi bharat jodo yatra
Pune: कात्रजच्या घाटात ST बस-दुचाकीचा भीषण अपघात! एक जागीच ठार, दोघे गंभीर

दरम्यान हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (५ नोव्हेंबर) भाजपच्या समर्थनार्थ सिंदर नगर आणि सोलन येथे दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत . राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजप रविवारी (६ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com