मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी विकली गाय; स्मार्टफोनसाठी गमावले उत्पन्नाचे साधन 

kuldeep-kumar
kuldeep-kumar

सिमला - मुलांना ऑनलाइन शिकता यावे म्हणून मोबाइल फोन खरेदीसाठी हिमाचल प्रदेशातील कुलदीप कुमार याला स्वतःची गाय विकावी लागली. 

कांगडा जिल्ह्यातील ज्वालामुखी येथे राहणाऱ्या कुलदीप कुमार याची दोन मुले चौथी व दुसरीत शिकत आहेत. शाळांनी ऑनलाइन वर्गांना सुरुवात केली तरी मोबाइलअभावी ही मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्यांचे शिक्षण पुढे सुरु ठेवण्यासाठी मोबाइल खरेदी करण्याचा सल्ला शिक्षकांनी दिल्याची माहिती कुलदीप यांनी एका इंग्रजी वृत्त पोटर्लशी बोलताना दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या दबावामुळे कुलदीपने बँक आणि जमीनदाराकडून सहा हजार रुपयांचे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने कोणीही त्याला मदत केली नाही. अखेर केवळ सहा हजार रुपयांसाठी कुटुंबाचे एकमेव उत्पन्नाचे साधन असलेली गाय विकणे त्याला भाग पडले.  पैसे मिळाल्यावर त्याने मुलांसाठी स्मार्टफोन खरेदी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंचायतीचे दुर्लक्ष 
कुलदीप हा ज्वालामुखी येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. त्याच्याकडे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठीची शिधापत्रिकाही नाही. आर्थिक मदतीसाठी तो पंचायतीकडे अनेक वेळा गेला पण कोणीही त्याला मदत केली नाही असे कुलदीपने सांगितले. दरम्यान, कुलदीपला तातडीने मदत करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले असल्याचे ज्वालामुखीचे आमदार रमेश धावला यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com