बस नदीत कोसळून 14 जण ठार

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मंडी (हिमाचल प्रदेश) - मंडी जिल्ह्यातील विंद्रवाणीजवळ बिआस नदीत खासगी बस कोसळून किमान 14 जण ठार झाले. 40 प्रवाशांना घेऊन ही बस कुलूहून मनालीकडे चालली होती. रस्त्यात आलेल्या मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात ही बस नदीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. मनालीपासून तीन किलोमीटरवर हा अपघात झाला. यात 14 जण ठार झाले.

अनधिकृतरीत्या मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 16 झाली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातातील जखमींना मंडीच्या विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यातील दोन जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.

Web Title: Himachal Pradesh : 16 deaths in Bus accident