Modi Cabinet Approves New Railway Projects : मोदी सरकारचा मोठा निर्णय! चार नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्राचाही समावेश

Modi Government approves four new railway projects : केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांची माध्यमांना माहिती दिली आहे.
Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.

Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.

esakal

Updated on

Indian Railways New Projects :  मोदी सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटने चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मीडियाला याबाबत माहिती देताना केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, की सात रेल्वे कॉरिडॉर एकूण रेल्वे वाहतूकीच्या ४१ टक्के वाहतूक करतात. आम्ही अशातच या कॉरिडॉरना मजबूत करण्यासाठी आणि अधिक जोडण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत." तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, आता हे कॉरिडॉर चार पदरी आणि शक्य असेल तेथे सहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय कॅबिनेटने चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च जवळपास २४ हजार ६३४ कोटी रुपये आहे. जाणून घेऊयात, या नव्या चार रेल्वे प्रकल्पांमध्ये कोणत्या मार्गाचा समावेश आहे?

१.महाराष्ट्रात वर्धा – भुसावळ दरम्यान तीन पदरी आणि चार पदरी रेल्वे मार्गाला मजुंरी मिळाली आहे, याचे एकूण अंतर ३१४ किलोमीटर आहे.

२.गोंदिया-डोंगरगढ दरम्यान चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. ज्याचे एकूण अंतर ८४ किलोमीटर आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये येतो.

Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.
Haryana ADGP Suicide : खळबळजनक! हरियाणाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांची गोळी झाडून आत्महत्या

३. वडोदरा-तलाम दरम्यान तीन आणि चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. ज्याचे एकूण अंतर २५९ किलोमीटर आहे. हा मार्ग गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये येतो.

४. मध्यप्रदेशात इटारसी-भोपाळ-बीनाल दरम्यान चार पदरी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे, ज्याचे एकूण अंतर २३७ किलोमीटर आहे.

Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.
PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

यासंदर्भात केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, जसजसे अनेक रेल्वे प्रकल्प येत आहेत, लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होत आहे. लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेसह आपल्या सारख्या अनेक देशांनी रेल्वेवर भर दिला आहे, कारण ही पर्यावरणपूरक आहे आणि खर्च कमी करण्यासही मदत करते.

Prime Minister Narendra Modi during the announcement of four new railway projects, marking a major step toward strengthening India’s rail network and Maharashtra’s development.
Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील १८ जिल्ह्यांचा समावेश असणारे हे चार रेल्वे प्रकल्प, भारतीय रेल्वेच्या सद्यस्थितीतील नेटवर्कला जवळपास ८९४ किलोमीटरपर्यंत वाढवतील. केंद्राकडून मंजूर केलेल्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे जवळपास ३ हजार ६३३ गावं, ज्यांची लोकसंख्या ८५.८४ लाख आहे आणि दोन जिल्हे (विदिशा आणि राजनांदगांव) पर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com