
Himachal Cloudburst Update: हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागात बुधवारी रात्री ढगफुटीच्या घटना घडल्या. यामुळे कुल्लू, किन्नौर, लाहौल स्पिती आणि शिमला या ठिकाणी हाहाकार उडाला आहे. पूल, गाड्या वाहून गेले आहेत. घरांसह दुकानांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणती जिवीतहानी झाल्याचं समोर आलं नाहीय. प्रशासनाने धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तर पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्गासह ३०० पेक्षा जास्त रस्ते बंद करण्यात आले आहेत.