Himachal Cloudburst Rescue : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. किन्नौर कैलास ट्रेक मार्गावर (Kinnaur Kailash Trek Route) दोन तात्पुरते पूल वाहून गेल्याने शेकडो यात्रेकरू अडकले होते. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तत्काळ कारवाई करत 'झिपलाइन'च्या साहाय्याने ४१३ यात्रेकरूंची सुरक्षित सुटका केलीये.