Himachal Pradesh CM : आप हजार तर काँग्रेस दीड हजार...दिल्लीनंतर महिलांसाठी हिमाचल सरकारची मोठी घोषणा!

Indiara Gandhi Pyari Behna Sukh Samman Nidhi Yojana : हिमाचल प्रदेशात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेच्या सहा आमदारांनी वेगळी वाट पकडलेली असताना काँग्रेस मात्र सर्वकाही अलबेल असल्याचे सांगत आहे.
Himachal Pradesh CM announces Rs 1500 per month to women
Himachal Pradesh CM announces Rs 1500 per month to women

Indiara Gandhi Pyari Behna Sukh Samman Nidhi Yojana : दिल्लीत अरविंद केजरीवाल सराकरने सोमवारी सादर केलेल्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली. यानुसार दिल्लीत मुख्यमंत्री महिला सम्मान योजना जाहीर करण्यात आली असून यामध्ये दिल्लीतील १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक महिलेला प्रति महिना १००० रुपये दिले जाणार आहेत. यानंतर आता हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने देखील महिलांसाठी योजना जाहीर केली आहे.

हिमाचल प्रदेशात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेच्या सहा आमदारांनी वेगळी वाट पकडलेली असताना काँग्रेस मात्र सर्वकाही अलबेल असल्याचे सांगत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील महिलांना आता सुख्कू सरकार दरमहिना १५०० रुपये देणारा आहे. मुख्यमंत्री सुख्कू यांनी आपल्या एक्स हँडलवर याबद्दल पोस्ट केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व माता-बहिणींना या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून दर महिना १५०० रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे.

Himachal Pradesh CM announces Rs 1500 per month to women
ISRO Chief S Somanath : आदित्य-L1च्या लाँचिंगच्या दिवशीच झालं कँसरचं निदान, तरीही...; इस्त्रो प्रमुखांचा मोठा खुलासा

त्यांनी लिहीलं की हिमाचल प्रदेशातील माझ्या सन्मानणीय माता-बहिणींचं राज्याला पुढे घेऊन जाण्यात अतुलनीय योगदान आहे. मी तुम्हा सर्वांना प्रणाम करत एक महत्वपूर्ण घोषणा करत आहे. इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सम्मान निधी योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. तुमचा सन्मान आणि तुमच्या हक्कांसाठी आमचे सरकार पूर्णपणे समर्पित आहे.

Himachal Pradesh CM announces Rs 1500 per month to women
Delhi Govt : दिल्लीत 18 वर्षांवरील सर्व महिलांना महिन्याला मिळणार हजार रुपये! जाणून घ्या काय आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या १० आश्वसनांपैकी हे एक होतं. मुख्यमंत्री सुक्खू यांनी सांगितलं की या योजनेवर दर वर्षी ८०० कोटी खर्च होतील आणि याचा लाभ पाच लाखांहून अधिक महिलांना होईल. त्यांनी सांगितलं की यासोबतच निवडणूक काळात देण्यात आलेली १० पैकी पाच आश्वासनं पूर्ण झाले आहेत. तसेच त्यांनी जूनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचे देखील सांगितलं. याचा राज्यातील १.३६ लाख कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com