Himachal Pradesh Politics
Himachal Pradesh Politicsesakal

Himachal Pradesh : 11 आमदार हिमाचलमधून उत्तराखंडला पोहोचले; काँग्रेसचं संकट संपलं नाही...

Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून सुरु झालेला राजकीय संघर्ष अजून टळलेला नाही. सहा बंडखोरांसह ११ आमदार शनिवारी भाजपशासित उत्तराखंडमध्ये पोहोचले. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरु असलेला कलहाचा शेवट काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Himachal Pradesh Politics : हिमाचल प्रदेशमध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून सुरु झालेला राजकीय संघर्ष अजून टळलेला नाही. सहा बंडखोरांसह ११ आमदार शनिवारी भाजपशासित उत्तराखंडमध्ये पोहोचले. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरु असलेला कलहाचा शेवट काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

एएनआयने दिलेल्या रिपोर्टनुसार शनिवारी सकाळी हरियाणाची नंबर प्लेट असलेली एक बस ऋषिकेशच्या ताज हॉटेलमध्ये पोहोचली. बसमध्ये सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांसह ११ आमदार होते. बसला कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.

Himachal Pradesh Politics
Ajit Pawar: नऊ नव्वदचा...फॉर्म्युला फिस्कटल्यामुळे अजित पवार भाजपवर नाराज?

काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले होते. राज्यातील पक्षाची परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

गुरुवारी जेव्हा त्यांना सहा बंडखोर आमदारांविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी म्हटलं की- जर कुणाला चुकीची जाणीव झाली असेल तर त्याला आणखी एक संधी दिली जाईल. त्याआधी हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य यांनी म्हटलं की, मी काँग्रेस हायकमांड आणि बंडखोरांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. आता निर्णयाचा चेंडू नेतृत्वाच्या कोर्टात असल्याचं ते म्हणालेले.

Himachal Pradesh Politics
IND vs ENG 5th Test : जास्तच उड्या मारतोय... विराटचा वारसा सर्फराजने चालवला; गिलसाठी बेअरस्टोला भिडला

राज्यसभा निवडणुकीत सहा बंडखोर आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले होते. परिणामी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

काँग्रेसमध्ये बंड करणाऱ्या सहा आमदारांमध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदर दत्त, लखनपाल, चेतन्या शर्मा आणि देविंदर भुट्टो यांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केले होते. अध्यक्षांच्या विरोधात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com