Voting
Voting

Himachal Election : हिमाचलमध्ये 65.50 टक्के मतदान; आता लक्ष निकालाकडे

Published on

नवी दिल्ली - सिमला : हिमाचल प्रदेशमध्‍ये राबविलेल्या विकासाचे धोरणामुळे पुन्हा सत्तेवर येण्याची आशा सत्ताधारी भाजपला वाटत आहे तर काँग्रेसने देखील मतदारांना आकर्षित करण्याचे अनेक प्रयत्न केले. आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.५० टक्के मतदानाची नोंद झाली.

Voting
Gujarat: स्टार प्रचारक ठरले! गुजरातमध्ये महाराष्ट्रातील 'हे' नेते गाजवणार निवडणुकीचं मैदान

हिमाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 35 जागांची गरज असते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 44 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. आज मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

जगातील सर्वात उंचीवर असलेल्या ताशीगांग मतदान केंद्रावर लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. येथे एकूण 52 मतदारांपैकी 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ताशीगांगमध्ये 98.08 टक्के मतदान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com