हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीची शक्‍यता

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

राज्याच्या मध्य आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्‍यता आहे, तर राज्याची राजधानी शिमला येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याने आज स्पष्ट केले आहे.

शिमला - जम्मू आणि काश्‍मीरच्या पूर्वोत्तर भागात चक्रीवादळ सरकल्याने हिमाचल प्रदेशच्या मध्य आणि उंचावरील भागावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. वास्तविक काल रात्रीपासून राज्याच्या उंचीवरील डोंगराळ भागात आणि नागरीवस्तीत थोड्या थोड्या वेळाने बर्फवृष्टी होत आहे.

राज्याच्या मध्य आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्‍यता आहे, तर राज्याची राजधानी शिमला येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याने आज स्पष्ट केले आहे.

आज सकाळपर्यंत लाहौल आणि स्पिटी येथे सहा सेंटिमीटर आणि रोहतांग पास येथे दहा सेंमी बर्फवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. किन्नरू जिल्ह्यातील कलपा, कोठी, पिन व्हॅली आणि अन्य उंचीवरील ठिकाणांवर येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. भारमौर आणि मनाली येथे अनुक्रमे पाच आणि तीन मिलिमीटर पाऊस झाला, तर चांबा जिल्ह्यातील सलूनी येथे 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याशिवाय मध्य आणि डोंगराच्या खालच्या भागात पाच मिलिमीटर पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Himachal Pradesh expects heavy snow fall