BJP National President Update: भाजप नाही देणार कोणतंच सरप्राइज? जाणून घ्या, नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचं अपडेट

BJP leadership decisions : बिहार निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार तयारी सुरू आहे.
BJP
BJPesakal
Updated on

Latest Update on BJP National Leadership: भारतीय जनता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत विविध तर्कही लावले जात आहेत. तर प्राप्त माहितीनुसार लवकरच भाजपकडून आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होवू शकते. 

  बिहार निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार तयारी सुरू आहे. पक्षाने संभाव्य उमेदवारांच्या नावांचे पॅनेल तयार केले आहे, ९ सप्टेंबर रोजी उपाध्यक्ष निवडणुकीनंतर पुन्हा सल्लामसलत प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

 त्यापूर्वी उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. कारण पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशातून राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून आणि गृहमंत्री अमित शहा हे गुजरातमधून निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीनंतरच ते राष्ट्रीय अध्यक्षांच्या नामांकनावर स्वाक्षरी करू शकतील.

संघटन मजूबत करण्यास सक्षम असणाऱ्या व्यक्तीची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड केली जाणार आहे.  पक्ष सामाजिक समीकरण किंवा प्रदेशाच्या आधारे निवड करू इच्छित नाही. सूत्रांनी असेही सांगितले की कोणतेही आश्चर्यकारक नाव नसेल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्या नावांची चर्चा होत आहे त्यापैकी एकाला अध्यक्ष बनवले जाऊ शकते.

BJP
ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

अशावेळी भाजपकडून एखाद्या मोठ्या चेहऱ्याला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तथापि, सूत्रांनी असेही सांगितले की जर काही कारणास्तव बिहार निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नवीन अध्यक्षाची निवड झाली नाही, तर ती बिहार निवडणुकीनंतरच लगेचच केली जाईल, परंतु निवडणुकीदरम्यान ही निवड होणार नाही.

BJP
Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

नवीन भाजप अध्यक्षांच्या निवडीला विलंब होण्याची अनेक कारणे आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे संघटनात्मक पातळीवर झालेली व्यापक चर्चा. नवीन भाजप अध्यक्षाचे नाव सुचवण्यासाठी संघ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुमारे शंभर नेत्यांशी संपर्क साधला आहे.  यामध्ये माजी भाजप अध्यक्ष, वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि संवैधानिक पदे भूषवणारे संघ आणि भाजपशी संबंधित नेते यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com