Shimla Road Accident
esakal
पिकअप व्हॅन दरीत कोसळल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात महिलेसह लहान मुलाचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून सध्या मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.