आता हिमाचल प्रदेश महिला आयोगानेही घेतली कंगनाची बाजू

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 September 2020

कंगनासंदर्भात त्रासदायकरित्या केलेल्या कारवाईचा मुद्दा योग्य प्राधिकरणाच्या सक्षम उपस्थितीत करुन तिला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घ्यावा, असे हिमाचल प्रदेश महिला आयोगाने म्हटले आहे.

शिमला : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या मुद्यावरुन मुंबईचा पाक व्याप्त काश्मिर उल्लेख केल्यामुळे कंगना राणावत वादाच्या भोवऱ्यात सापडली. तिच्या या भूमिकेनंतर वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र सरकार विरुद्ध कंगना असे चित्र निर्माण झाले असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आणि या सुरक्षेच्या कवचात ती मुंबईमध्ये दाखल झाली. ती मुंबईत दाखल होण्यापूर्वी तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. यामुद्यावरुन राजकारण तापत असताना   हिमाचल प्रदेश महिला आयोगाने कंगनाची बाजू घेत या प्रकरणात उडी घेतली आहे.  यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगला पत्र लिहिले असून मुंबई महानगर पालिकेने राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात दाद मागितली आहे. 

कंगना वादात आता अभिजीत भट्टाचार्य यांची उडी, खान अभिनेत्यांसोबतंच अजय देवगणवरही साधला निशाणा

कंगनासंदर्भात त्रासदायकरित्या केलेल्या कारवाईचा मुद्दा योग्य प्राधिकरणाच्या सक्षम उपस्थितीत करुन तिला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घ्यावा, असे हिमाचल प्रदेश महिला आयोगाने म्हटले आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेने 33 वर्षीय अभिनेत्रीच्या बांद्रा स्थित कार्यालयावर कारवाई केली होती. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात आहे.  बीएमसी, मुंबई पोलिस आणि राजकीय नेत्यांनी कंगनाला त्रास दिला आहे. या पत्राची एक प्रत महाराष्ट्र महिला आयोगालाही पाठवण्यात आली आहे. 

हे ही वाचा: कंगनानंतर आता फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राला बीएमसीने पाठवली नोटिस  

गुरुवारी कंगनाने पालीस्थित कार्यालयाची पाहणी केली होती. यावेळी कंगनासोबत तिची बहिण आणि मॅनेजरही होता. मुंबई महानगर पालिकेने अनाधिकृत बांधकामासंदर्भात कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला होता. जवळपास 48 कोटी रुपयांच्या कार्यालयात मोठे नुकसान झाल्याचा दावा टिम कंगनाने केलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: himachal pradesh women commission wrote a letter in the case of kangana ranaut