कंगना वादात आता अभिजीत भट्टाचार्य यांची उडी, खान अभिनेत्यांसोबतंच अजय देवगणवरही साधला निशाणा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

कंगनाच्या ऑफीसवर बीएमसीने कारवाई केल्यानंतर बॉलीवूडमधल्या अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. यादरम्यान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी कंगनाची बाजु घेत बॉलीवूडच्या काही बड्या नावांवर निशाणा साधला आहे. 

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफीसवर कारवाई करत त्याची तोडफोड केल्यानंतर हा वाद जास्तंच वाढत चालला आहे. आत्तापर्यंत कंगना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत होती मात्र आता तर तिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच खडे बोल सुनावले आहेत. कंगनाच्या ऑफीसवर बीएमसीने कारवाई केल्यानंतर बॉलीवूडमधल्या अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. यादरम्यान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी कंगनाची बाजु घेत बॉलीवूडच्या काही बड्या नावांवर निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा: कंगनानंतर आता फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राला बीएमसीने पाठवली नोटिस  

गायक अभिजित भट्टाचार्य यांनी सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय, 'सलमान खानने सूरज पांचोलीला वाचवलं तर हा पब्लिसिटी स्टंट नाही. अजय देवगण संजय दत्तचं समर्थन करतो तो देखील पब्लिसिटी स्टंट नाही. शाहरुख खान प्रियांका चोप्राला वाचवतो तो पण पब्लिसिटी स्टंट नाही मात्र कंगना रनौत जर सुशांत सिंह राजपूतचं समर्थन करतेय तर तो पब्लिसिटी स्टंट आहे. ओके.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kyu bhai ?? #bollywood #kangnaranaut #republictv #republicbharat #sushantsinghrajput

A post shared by Abhijeet Bhattacharya (@abhijeetbhattacharya) on

गायक अभिजित भट्टाचार्य हे असं बॉलीवूडच्या बड्या नावांच्या विरोधात पहिल्यांदाच बोलले आहेत असं नाही. याआधी देखील त्यांनी शाहरुख खान, सलमान खानवर तोंडसुख घेतलं आहे. आता जेव्हा कंगना रनौतचं हे प्रकरण जोरात सुरु आहे तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा शाहरुख आणि सलमान खानवर निशाणा साधला आहे.     

abhijeet bhattacharya slams salman khan to shah rukh khan compare to kangana ranaut  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhijeet bhattacharya slams salman khan to shah rukh khan compare to kangana ranaut