कंगनानंतर आता फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राला बीएमसीने पाठवली नोटिस

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

कंगना रनौतच्या ऑफीसवर बीएमसीने कारवाई करुन तोडफोड केल्यानंतर आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला बीएमसीने नोटिस पाठवली आहे.

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफीसवर बीएमसीने कारवाई करुन तोडफोड केल्यानंतर आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला बीएमसीने नोटिस पाठवली आहे. बीएमसीने ही नोटिस त्याने त्याच्या ऑफीसमध्ये अनधिकृत बदल केल्यामुळे पाठवली आहे. तसंत सात दिवसाच्या आत बीएमसीने मनिषला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

हे ही वाचा: अनुराग कश्यपने जाहीर केले सुशांतच्या मॅनेजरसोबतचे व्हॉट्सअप चॅट म्हणाला, 'माफ करा पण..'

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राला बीएमसीने कंगनाच्या ऑफीसवर कारवाई करण्याअगोदरंच नोटिस पाठवल्याचं कळतंय. बीएमसीने मनिषला ७ सप्टेंबरला नोटिस पाठवली होती. त्यांनी या नोटिसमध्ये असा आरोप केला आहे की मनीषने त्याच्या ऑफीसच्या बिल्डिंगमध्ये अनधिकृत बदल केले आहेत. यासाठी बीएमसीने त्याला सात दिवसांचा वेळ दिला आहे आणि त्याच्याकडून उत्तर मागितलं आहे. 

बीएमसीने नुकतंच बेकायदेशीर बांधकाम आणि योजनानुसार ऑफीसचं बांधकाम करु नये यासाठी नोटिस पाठवली होती. कंगनाने या नोटिसवर कोणतही उत्तर दिलं नाही. त्यामुळे बुधवारी बीएमसीने कंगनाच्या ऑफीसमधील बेकायदेशीर जागा तोडली. तर बीएमसीच्या या कारवाईवर कंगनाने ही बदल्याची भावना असल्याची प्रतिक्रिया दिली होती. कंगनाने एकानंतर एक ट्विट करुन या कारवाईचा निषेध केला होता तसंत सरकारवरही टिका केली होती.   

bmc issued a show cause notice to fashion designer manish malhotra  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc issued a show cause notice to fashion designer manish malhotra