
हरियाणातील रोहतकमध्ये शनिवारी एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. काँग्रेसची युवा महिला नेता हिमानी नरवाल हिच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडालीय. या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी एक एसआयटी स्थापन केलीय. रविवारी हिमानीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी हिमानीच्या आईने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर खळबळजनक आरोप केलेत. मुलीचा खून राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप आईने केलाय.