"भाजप आता कोणत्याही राज्यात निवडणूक जिंकायला सक्षम"

आज १४ राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले.
bjp
bjpsakal
Updated on: 

देशातील १४ राज्यांत ३२ रिक्त जागांसाठी विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या प्रमुख राज्यांचा समावेश होता. त्यामध्ये आसाममध्ये भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. यावरुनच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी भाजपला मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप हा आता पाच सहा राज्यांसाठी मर्यादित नसल्याचं सांगितलंय.

bjp
"प्रिय विराट त्यांना माफ कर"; काँग्रेस युवराजाची कर्णधाराला साथ

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भाजप हा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष झाला असून, तो पाच सहा राज्यांसाठी मर्यादित राहिला नसल्याचं सांगितलं. तसेच भाजप कोणत्याही राज्यात निवडणुक जिंकण्यासाठी सक्षम झाला असल्याचं सांगितलं आहे. "आम्ही सर्व 5 जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. आसाममधील आजचा निवडणूकीतील विजय हा काही सामान्य विजय नाही, कारण प्रत्येक जागेवर आपण सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा जास्त फरकाने जिंकलो आहोत. ईशान्येतील लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे" अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
Woman Attacks Magistrate, Prosecutor and Police Officer
Congress MLA finds couple in  his room
Indian Air Force IL-76 Lands at Nyoma Airbase