जवानांनी हाडं गोठणाऱया थंडीत केला योगा (व्हिडिओ)

Himveers of Indo Tibetan Border Police prepare for Yoga Day in freezing temperatures at 18000 feet altitude
Himveers of Indo Tibetan Border Police prepare for Yoga Day in freezing temperatures at 18000 feet altitude

लडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं गोठवणाऱ्या थंडीत योगा केला आहे. जवानांनी हाडं गोठणाऱया थंडीमध्ये केलेला योगा पाहून भारतीय अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. जवान सीमेचे रक्षण करत असतानाच एक आदर्श घालवून देत आहेत. जवानांच्या योगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र महासंघाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव नरेंद्र मोदींनी मांडला होता. संयुक्त राष्ट्रांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.

...म्हणून 21 जून रोजीची निवड
जगभरातील अनेक देशांमध्ये 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व असून, हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com