Hindi Din : हिंदी जगातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindi  Language Day

Hindi Language Day : हिंदी जगातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा

Hindi Bhasha din : आज हिंदी भाषा दिन आहे. जगात हिंदी भाषेचे वर्चस्व वेगात वाढत आहे. १९०० ते २०२१ या १२१ वर्षांच्या काळात हिंदीच्या प्रसाराचा वेग १७५.५२ टक्क्यांनी वाढला आहे. इंग्रजीचा वेग ३८०.७१ टक्के आहे. त्यानंतर सर्वात वेगात प्रसार होणारी भाषा हिंदी आहे. सध्या जगात इंग्रजी आणि मंदारिन या भाषांनंतर हिंदी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.

हेही वाचा: भारताविरूद्ध चीनचा नवा डाव! हिंदी भाषा येणाऱ्यांची सैन्यदलात भरती

आधी १९ व्या शतकात जागात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी चौथ्या स्थानावर होती. स्टॅटेस्टिकनुसार त्यावेळी मंदारिन, स्पॅनिश आणि इंग्रजी या अनुक्रमे पहिल्या तीन भाषा होत्या. जसजसा देश प्रगती करत आहे तशी भारतीय भाषांची विशेषतः हिंदीची पोहच वाढली आहे. बऱ्याच कालावधीनंतर १९६१ मध्ये हिंदी भाषेने स्पॅनिश भाषेला मागे टाकत जगातिल सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. आता जगभरात ४२.७ कोटी लोक हिंदी बोलतात. त्यात वाढ होत २०२१ मध्ये ६४.६ कोटीवर पोहचली. ही संख्या ज्यांची मातृभाषा हिंदी अशा ५३ कोटी लोकांशिवाय आहे.

हेही वाचा: संयुक्त राष्ट्रसुद्धा स्विकारणार हिंदी भाषा; भारताचा प्रस्ताव मान्य

भारतात ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी

देशात ४३.६३ टक्के म्हणजेच ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी आहे. १३.९ कोटी म्हणजेत ११ टक्के लोकांची ही दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगात ६४.६ कोटी लोक हिंदी भाषिक आहेत.

हेही वाचा: हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

गूगलवर १० लाख कोटी पाने हिंदीत आहेत.

गूगलवर सात वर्षात हिंदी भाषेतील माहिती ९४ टक्क्याने वाढते. याचे १० लाख कोटी पाने हिंदीत उपल्ब्ध आहेत.

  • जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये ६ हिंदी वृत्तपत्र आहेत.

  • भारताबाहेर २६० हून अधिक विश्वविद्यालयांत हिंदी शिकवली जाते.

  • परदेशात २८ हजारपेक्षा जास्त शिक्षण संस्था हिंदी शिकवत आहेत

Web Title: Hindi Bhasha Din Hindi Language Day Third Highest Speaking Language Of World

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hindi language day