
Hindi Din : हिंदी राष्ट्रप्रेमाची भाषा; हिंदी दिनानिमित्त अमित शाहांकडून गौरवोद्गार
सूरत : स्थानिक भाषा आणि हिंदी हे आपल्या सांस्कृतिक प्रवाहाचे प्राण आहेत. हिंदी ही राष्ट्रप्रेमाची भाषा आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदीचा गौरव केला आहे. राष्ट्रभाषा दिनानिमित्त सूरतमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Hindi is language of patriotism Honored by Amit Shah on occasion of Hindi Day)
शाह म्हणाले, स्थानिक भाषा आणि हिंदी भाषा हे आपल्या सांस्कृतिक प्रावाहाचे प्राण आहेत. जर आपल्या आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आत्मा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला अधिकृत भाषा शिकावी लागेल. जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्थानिक भाषा मजबूत कराव्या लागतील.
ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या भाषांचा न्यूनगंड संपेल
अधिकृत भाषा आणि स्थानिक भाषा मिळून ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या भाषांचा न्यूनगंड उखडून टाकतील, त्यासाठी स्थानिक भाषा शिकण्याची वेळ आली आहे.