Christmas: ख्रिसमस दिवशी विश्व हिंदू परिषदेचा अजब फतवा, हिंदू मुलांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu body warning to schools ahead of Christmas India is land of saints not Santa

Christmas: ख्रिसमस दिवशी विश्व हिंदू परिषदेचा अजब फतवा, हिंदू मुलांना...

जगभरात आज ख्रिसमस सण साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक सणासुदीला शाळा, कॉलेजेस मध्ये विविध संकल्पना राबवून सण साजरा केला जातो. तसेच, ख्रिसमस दिवशीही विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, यंदा हिंदू परिषदेने या सर्वा गोष्टीस विरोध दर्शवला आहे. (Hindu body warning to schools ahead of Christmas India is land of saints not Santa )

विश्व हिंदू परिषदेने शाळांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यास विरोध केला आहे.मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून त्यांनी शाळेत ख्रिसमस साजरा करु नये, तसेच विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवू नये असा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Christmas Cake : कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

काय म्हटले आहे पत्रात?

मध्य भारतातील लोक हे सनातन हिंदू धर्म आणि त्याची परंपरा मानतात. मात्र शाळेत ख्रिसमसच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्यास भाग पाडलं जातं. हा आपल्या हिंदू संस्कृतीवर एकप्रकारे हल्ला आहे.

हिंदू धर्मातील विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची प्रेरणा देण्याचे हे एक षडयंत्र आहे. तसेच विद्यार्थ्यांना ख्रिसमसनिमित्त वेगळे कपडे घ्यायला लावणे, ख्रिसमस ट्री घ्यायला भाग पाडणे, हे देखील पालकांवर आर्थिक ताण आणणारे असते.”

हेही वाचा: Christmas 2022: 'Secret Santa' व्हा अन् जिंका मनं! फक्त 500 रुपयांत क्रिसमससाठी बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स

शाळा हिंदू मुलांना सांताक्लॉज बनवून ख्रिश्चन धर्माबद्दल श्रद्धा आणि आस्था उत्पन्न करण्याचे काम करत आहेत का? आमची हिंदू मुलं राम बनो, कृष्ण बनो, बुद्ध बनो किंवा महावीर, गुरु गोविंद सिंह यापैकी काहीही बनो. याशिवाय क्रांतिकारी, महापुरुष ही बनोत पण सांताक्लॉज बनायला नकोत. ही भारताची भूमी संतांची भूमी आहे. सांताक्लॉजची नाही.

जर शाळा विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्याचा आग्रह करत असेल तर अशा शाळांविरोधात विश्व हिंदू परिषद कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबेल,”, अशा इशारा पत्रातून दिला आहे.

टॅग्स :Christmas Festival