
हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येनंतर सिंगभूम जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये तणाव वाढलाय.
हिंदुत्ववादी नेते कमल देवगिरी (Kamal Devagiri) यांच्या हत्येनंतर झारखंडच्या (Jharkhand) पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात दोन समुदायांमधील वाढता तणाव लक्षात घेता, कलम 144 लागू करण्यात आलंय. या नेत्याच्या हत्येनंतर मृतदेह रात्री उशिरापर्यंत ठेऊन दगडफेकही करण्यात आली. यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलं.
गिरीराज सेना (Giriraj Sena) नावाची हिंदूवादी संघटना (Hindu Organization) चालवणारे कमल देवगिरी यांची तीन गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्ब फेकून हत्या केली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. सध्या गुन्हेगारी घटनांमुळं राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. गुन्हेगारांवर कायदा आणि पोलिसांचा धाकच राहिला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. गुन्हेगारांकडून सातत्यानं हिंसक घटना घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये अटक होत असली, तरी गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
पश्चिम सिंगभूमच्या चक्रधरपूरमध्ये गिरीराज सेना नावाची संघटना चालवणारे हिंदू नेते कमल देवगिरी (30) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. हिंदूत्ववादी नेत्याच्या या हत्येनंतर संपूर्ण चक्रधरपूरमध्ये वाढता तणाव पाहता प्रशासनानं कलम 144 लागू केलं आहे. चक्रधरपूरच्या तरुणांमध्ये गिरीराज सेना प्रमुख कमल देवगिरी यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढत होती. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते, त्यामुळंच त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चक्रधरपुरातील भारत भवन इथं असलेल्या सरस्वती शिशू विद्या मंदिर तुलसी भवनजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन गुन्हेगारांनी शनिवारी सायंकाळी कमल यांची हत्या केली. घटनेनंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.