'हिंदू धर्म स्वीकारा, न्याय मिळवा'; तलाकपीडित महिलांना अजब सल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

अलिगड (उत्तर प्रदेश) - तोंडी तलाकवर बंदी आणण्याबाबत देशभर चर्चा सुरू असताना हिंदू महासभेने तलाक संपविण्यासाठी अजब उपाय सुचवला आहे. तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय हवा असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे.

अलिगड (उत्तर प्रदेश) - तोंडी तलाकवर बंदी आणण्याबाबत देशभर चर्चा सुरू असताना हिंदू महासभेने तलाक संपविण्यासाठी अजब उपाय सुचवला आहे. तलाक पीडित मुस्लिम महिलांना न्याय हवा असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे.

हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुस्लिम महिलांना आवाहन केले. त्या म्हणाल्या, "जर आमचे सरकार आणि आमचे कायदे तुम्हाला न्याय देऊ शकले नाही, तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ.' मुस्लिम तलाक पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी पांडे यांनी "उत्थान यज्ञा'चे आयोजन केले होते. अनेक मुस्लिम महिला आणि पुरुष यज्ञात सहभागी झाले. उपस्थित सर्वांनी तोंडी तलाक प्रथेविरुद्ध लढण्याची शपथ घेतली. "पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी मी समर्पित भावनेने काम करत आहे. या सर्व पीडित महिलांचे पुन्हा लग्न केले जाईल. मी स्वत: त्यांचे कन्यादान करेल', असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.


जर त्यांना (हिंदू महासभा) खरोखरच मदत करावीशी वाटत असेल तर त्यांनी पीडित महिलांचे ऐकून घ्यावे. त्यांना सल्ला द्यावा. शिक्षण द्यावे. त्यांचा आत्मविश्‍वास वाढवावा. त्यांच्यात स्वत:च्या पायाभर उभे राहण्याची क्षमता निर्माण करावी.
- शीरिन मसरून, अध्यक्षा
उत्तर प्रदेश ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्ड


त्यांनी प्रथम हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या आणि हिंदू धर्मातील महिलांवर होणारे शारिरीक अत्याचार संपवावेत. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून तोंडी तलाकविरुद्ध लढत आहोत आणि न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहिल.
- मारिया आलम, सामाजिक कार्यकर्त्या


Web Title: hindu mahasabha appeals triple talaq victims to convert to hinduism in order to get justice