पत्नीनं जबरदस्तीनं बीफ खायला घातलं, पतीची गळफास घेऊन आत्महत्या!

याप्रकरणी पोलिसांत पत्नी आणि मेहुण्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Surat news
Surat news
Updated on

सूरत : पत्नीनं जबरदस्तीनं बीफ खायला घातल्यानं पतीनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुजरातमधील सूरतमध्ये घडली आहे. याप्रकरणी पत्नी आणि मेहुण्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Hindu man dies by suicide after Muslim wife forcefully feed him beef in Surat)

Surat news
एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रोहित प्रतापसिंह राजपूत असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जूनमध्ये ही घटना घडली होती. दोन महिन्यांनंतर त्याच्या मृत्यूमागचं कारण समोर आलं आहे. गळफास घेण्यापूर्वी त्यानं फेसबूकवर एक पोस्टही लिहिली होती. या पोस्टवरुनच त्याच्या आत्महत्येच कारण समोर आलं आहे. यावरुनच पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Surat news
लालबागचा राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न; भाविकांची मोठी गर्दी

"आत्महत्या केलेल्या रोहितनं आपल्या फेसबुकवरील सुसाईड नोटमध्ये म्हटलं की, मी हे जग सोडून चाललो आहे. याला कारणीभूत माझी पत्नी सोनम अली आणि तिचा भाऊ अख्तर अली हे आहेत. माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा. मला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीनं बीफ खाऊ घातलं. आता बीफ खाल्यानं मी या जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मी आत्महत्या करत आहे"

Surat news
इशाऱ्यांवर चालणारं हॉटेल! संभाजीराजेंनी कौतुक करत सांगितली खासियत

रोहितच्या या फेसबूक पोस्टबाबत त्याच्या नातेवाईकांना दोन महिन्यांनंतर कळालं. त्यानंतर त्यांनी सूरत पोलिसांमध्ये धाव घेतली. रोहितच्या आईनं त्याच्या पत्नी आणि मेहुण्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी रोहितची आई वीणादेवी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com