मुंबईतील लालबागचा राजा गणेशाच्या यंदाच्या मूर्तीचं सोमवारी संध्याकाळी ७ वाजता अनावरण झालं. बाप्पाचं पहिलं रुप पाहण्यासाठी अर्थात मुखदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पडदा पडला आणि त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष झाला.
लालबागच्या राजाचं हे ८९ वं वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे. बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतेय. तत्पूर्वी राजाची यंदाची गणेश मुर्ती मंडपात विराजमान झाली आहे.
लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आणि फोटोग्राफर्सनी मंडपाजवळ मोठी गर्दी केली होती. मूर्तीचं अनावरण होण्यापूर्वी पडदा उघडताना लोकांनी काऊंटडाऊन सुरु केलं, त्यानंतर जसजसा काऊंट कमी होत होता तसंतसा उपस्थितांमध्ये उत्साहाचं उधाणं आलं होतं. यावेळी अनेक फोटोग्राफर्स आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची धडपड पहायला मिळाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.