
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच एका मुस्लिम तरुणाला जामीन मंजूर केला आहे. या तरुणावर ओळख लपवून एका हिंदू मुलीशी लग्न केल्याचा आरोप आहे. या दरम्यान, सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, परस्पर संमतीने एकत्र राहणाऱ्या दोन प्रौढांना केवळ वेगवेगळ्या धर्माचे असल्याने आक्षेप घेता येणार नाही. या दरम्यान, सुप्रीम कोर्टाने एका मुस्लिम तरुणाचा जामीन मंजूर केला, जो हिंदू महिलेशी लग्न केल्यानंतर सुमारे सहा महिने तुरुंगात होता.