सनी लिऑनच्या वेबसाइटवर हिंदुत्ववाद्यांचा 'डोळा'

वृत्तसंस्था
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

अभिनेत्री सनी लिऑनच्या पॉर्न वेबसाइटवर भारतात बंदी घालण्यासाठी हिंदू जनजागरण समितीने मोहीम हाती घेतली आहे. संस्थेचे कार्यकर्ते 10 सप्टेंबरपासून राष्ट्रीय मोहिम सुरू करणार असून, याची सुरवात काशी येथील शास्त्री घाटापासून होणार आहे.

भारतामध्ये सनी लिऑनच्या पॉर्न वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, ही समितीची मुख्य मागणी आहे. भारताची सांस्कृतीक राजधानी काशी असल्यामुळे मोहिमेस तेथून सुरवात करत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

भारतामध्ये अनेक पॉर्न साइट पाहिल्या जातात. परंतु, एकट्या सनी लिऑनच्याच वेबसाइटवर बंदी का? असा प्रश्न केला असता समितीच्या कायकर्त्यांनी म्हटले आहे की, ‘पॉर्न अभिनेत्री म्हणून सनी लिऑनची मोठी ओळख झाली आहे. भारतामधून सनीच्या नावाने सर्वाधिक नेटिझन्स सर्च करताना दिसतात. शिवाय, तिचेच संकेतस्थळ सर्वाधिक पाहिले जाते. दिवसेंदिवस सनीची लोकप्रियता वाढत आहे, खरे तर हे भारतीय संस्कृतीसाठी धोकादायक आहे. सर्वच पॉर्न वेबसाइट बंद करायला हव्यात. परंतु, एक-एक पाऊल पुढे टाकत जाणार आहोत.‘

समितीचे निलेश सिंगबल म्हणाले, ‘आमच्या मोहिमेमध्ये अनेकजण सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने सरकारने पॉर्न वेबसाइटवर बंदी घालायला हवी.‘

Web Title: An Hindu organization eyes to close down Sunny Leone website