JNU मधील वाद चिघळला, ‘ब्राह्मण और बनियों भारत छोडो’ला हिंदू पक्षाकडून जशास-तसं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JNU Issue

JNU मधील वाद चिघळला, ‘ब्राह्मण और बनियों भारत छोडो’ला हिंदू पक्षाकडून जशास-तसं उत्तर

नवी दिल्लीः दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारातील अनेक भिंतींवर ब्राह्मण व वैश्य समाजांच्या विरोधात घोषणा लिहिल्या होत्या. त्याला आज हिंदू रक्षा दलाने प्रत्युत्तर दिलं आहे. कम्युनिस्ट भारत छोडो, अशा घोषणा मेन गेटवर लिहिण्यात आलेल्या आहेत.

‘जेएनयू’च्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या (स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज) इमारतीतील भिंती काही जातींच्या विरोधातील घोषणांनी विद्रूप केल्याचे निदर्शनास आल्यावर दिल्लीतील विद्यापीठे व महाविद्यालयीन वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. विद्यापीठ परिसरात काही अज्ञात घटकांनी आवाराच्या भिंती आणि प्राध्यापकांच्या खोल्या विद्रुप केल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाने घटनेची दखल घेत या प्रकरणी संबंधित विभागाचे प्रमुख आणि तक्रार समितीला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास कुलगुरूंनी सांगितले आहे, असे ‘जेएनयू’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. आज हिंदू रक्षा दलाच्या लोकांनी कम्युनिस्ट भारत छोडो, असं लिहून विद्यापीठ प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. 'Communist=ISISI' असंही लिहिण्यात आलेलं आहे. कम्युनिस्टांची तुलना दहशतवादी संघटनेशी करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: कुंकू रुसलं! नवरदेवाने वरमाला घालताच नवरीचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक कारण...

हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सांगितलं की, आम्ही केवळ हिंदू सनातनी आहोत. आमच्या लोकांमध्ये चार वर्ण आहेत. यांनी आम्हांला भारत सोडा असं म्हटलं होतं. परंतु आता आम्हीच यांच्यापासून भारताला सोडवू. आमच्यावर लिहून ते आता लपून बसले आहेत तर आम्ही समोर लिहूनही समोर आलेलो आहोत.