'लव्ह जिहाद'च्या संशयामुळे मेरठमध्ये घरात घुसून मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

मेरठ (उत्तर प्रदेश) - संस्कृतीरक्षकाच्या भूमिकेत जाऊन उत्तर प्रदेशमधील हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी "लव्ह जिहाद'च्या संशयावरून एका प्रेमी युगुलाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुस्लिम युवकाचे हिंदू युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेमी युगुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापूर्वी त्यांनी घरात घुसून दोघांनाही मारहाण करत बाहेर आणले. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना हिंदू युवा वाहिनीचे प्रमुख नागेंद्र सिंह तोमर म्हणाले, 'एका घरामध्ये हिंदू मुलीसोबत प्रेमाचार करणाऱ्या मुस्लिम युवकावर कडक कारवाई करण्याबाबत आम्ही पोलिसांना सांगितले आहे. त्या तरुणाला तिचे धर्मांतर करायचे होते. कोणत्याही पडताळणीशिवाय घर भाड्याने देणाऱ्या घराच्या मालकावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.'

हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धर्मांतराच्या संशयावरून एका चर्चमधील प्रार्थना थांबविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता.

Web Title: hindu yuva vahini barges into meerut home drags couple to police