राजकारणात महिलाच होतायत ट्रोल; बदनामीकारक ट्‌विटची संख्या जास्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

प्रत्येक सात ट्विटपैकी एका ट्विटमध्ये हे त्यांच्यासाठी त्रासदायक आणि त्यांची बदनामी करणारे असते. धमक्‍या, लिंगभेद तसेच धर्म, जात, वर्णद्वेषासंबंधीचा मजकूर अशा ट्‌विटमध्ये असतो, असे "ऍमेनेस्टी इंडिया'च्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियाचे Social Media एक व्यासपीठ असलेले ट्‌विटर Twitter हे भारतीय राजकारणातील महिलांसाठी घातक ठरत आहे. याचे कारण म्हणजे या समाजमाध्यमावरून त्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण "ऍमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या संस्थेने ताज्या अभ्यासातून नोंदविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक सात ट्विटपैकी एका ट्विटमध्ये हे त्यांच्यासाठी त्रासदायक आणि त्यांची बदनामी करणारे असते. धमक्‍या, लिंगभेद तसेच धर्म, जात, वर्णद्वेषासंबंधीचा मजकूर अशा ट्‌विटमध्ये असतो, असे "ऍमेनेस्टी इंडिया'च्या अहवालात म्हटले आहे. मार्च ते मे 2019 मध्ये 95 भारतीय राजकारणी महिलांना त्रासदायक ठरणारी दहा लाख ट्विट पोस्ट करण्यात आली. याचाच असा की दररोज सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत साधारणपणे प्रत्येक महिला नेत्याबद्दल 113 वाईट ट्विट केले गेले. 95 महिलांच्या एकूण ट्विटमध्ये या ट्विटचे प्रमाण 13.8 टक्के आहे. हे सर्व ट्विट त्रासदायक आणि बदनामीकारक या प्रकारात मोडणारे आहेत. यातील प्रत्येक पाचव्या ट्विटमध्ये लिंगभेद आणि स्त्रीद्वेष डोकावतो. मुस्लिम महिला राजकारणी किंवा मुस्लिमधार्जिण्या अशी ओळख असलेल्या महिला नेत्यांबद्दल अन्य धर्मीयांपेक्षा 55.5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट केली गेली आहे, असे अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मागासवर्ग जातींमधील महिला नेत्यांवरील 59 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ट्‌विट हे जातीवर आधारित टीकेची आहेत.

अभ्यासातील ठळक मुद्दे

  • भाजपपेक्षा कॉंग्रेसच्या महिला नेत्यांबद्दल वाईट ट्विटचे प्रमाण 45.3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त
  • इतर सर्व पक्षांतील महिला नेत्यांबाबत हे प्रमाण 56.7 टक्के
  • वेगवेगळी राजकीय विचारधारा, धर्म, जात, वर्ण, वय, वैवाहिक स्थिती आणि निवडणूक निकाल असा सर्व टप्प्यांमधील महिला नेत्यांवर लिंगभेदावर आधारित ट्विट

"ट्रोल पॅट्रोल इंडिया ः एक्‍सपोझिंग ऑनलाइन ऍब्युज फेस्ड बाय वुमेन पॉलिटिशन्स इन इंडिया' अशा शीर्षकाने हे संशोधन सर्वेक्षण, उपलब्ध माहिती आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्याने केले असल्याचे "ऍमेनेस्टीने सांगितले. सुमारे 95 महिला नेत्यांची 2019मधील तीन महिन्यांच्या काळातील 1.14 लाख ट्‌विटचा अभ्यास केला असता त्यातील 70 लाख ट्‌विट त्यांच्या बदनामीची आहेत, असे सांगण्यात आले. "ऍमेनेस्टी'ने हे निष्कर्ष नोव्हेंबर 2019 मध्ये ट्‌विटरला पाठविले आहेत. सार्वजनिक चर्चेपासून फारकत घेणारे, बदनामीकारक आणि "स्पॅम'पासून मुक्त ठेवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे "ट्विटर'ने स्पष्ट केले आहे. मात्र, महिला राजकारणी ज्या प्रकारे ट्रोल झाल्या आहेत, त्यावरून महिला हक्कांचा आदर करण्यात "ट्‌विटर' अपयशी ठरले असल्याची टीका "ऍमेनेस्टी'ने केली आहे.

 

ट्विटरवर महिलांची सातत्याने आणि कठोरपणे बदनामी केली जाते. याचा परिणाम म्हणजे यावर कायमच मौन बाळगण्यात येते.
- अविनाश कुमार, कार्यकारी संचालक, ऍमेनेस्टी इंटरनॅशनल इंडिया

 

ट्‌विटरची टिवटिव

95 टक्के
राजकारणी महिला ट्रोल

1.14 लाख
एकूण ट्‌विटची तपासणी

70 लाख
बदनामीकारक ट्‌विट

13.8 टक्के
त्रासदायक ट्‌विटचे प्रमाण

55.5 टक्के
मुस्लिम महिला नेत्यांच्या बदनामीच्या ट्विटचे प्रमाण

56.7 टक्के
इतर सर्व पक्षांतील महिला नेत्यांबाबतचे प्रमाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women politicians in india gets more troll than us and uk