असा झाला गुलाबाचा जन्म; वाचा 3 कोटी 50 लाख वर्ष जुना इतिहास

History of Rose: गुलाबाचे झाड हे ३ कोटी ५० लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे, असं जीवाश्म संशोधनात सापडलेल्या पुराव्यांवरुन कळतं.
History of Rose
History of RoseSakal
Updated on

History of Rose: गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतीक! कित्येक प्रेमकथांचा श्रीगणेशा हा गुलाबाचं फुल देऊनच होतो. व्हॅलेन्टाईन आठवडा (Valentines Week) आता सुरू झाला आहे. या आठवड्याची सुरुवात 'रोझ डे'नं (Rose Day) होते. गुलाबाचं महत्त्व तर आपण सारेच जाणतो, परंतु गुलाबाच्या फुलाचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? चला रोझ डेच्या निमित्ताने जाणून घेऊया गुलाबाच्या इतिहासाची....

गुलाबाचे झाड हे ३ कोटी ५० लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे, असं जीवाश्म संशोधनातून सापडलेल्या पुराव्यांवरुन कळतं. मात्र गुलाबांची औपचारिक शेती करण्याची सुरुवात अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये (China) झाली. रोमन साम्राज्याच्या काळात मध्य-आशियामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबांच्या वेगवेगळ्या झाडांची लागवड केली जायची. रोमन साम्राज्यात गुलाबाच्या पाकळ्यांपासून सुगंधी अत्तरे, वनस्पती, औषधे बनविण्यासाठी तसेच सण समारंभात सजावटीसाठीही गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे.

History of Rose
Rose Day: गुलाब फक्त प्रेमाचं प्रतीक नाही, आरोग्याचा खजिना आहे

सातव्या शतकामध्ये काही ठिकाणी तर गुलाबांना आणि गुलाब जलाला अनेक राजांनी औपचारिक चलन म्हणून घोषित केले. त्यामुळे गुलाब हा व्यापार करायचा एक दुवा झाला होता. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात लागवडीची गुलाबे युरोपात दाखल झाली. आता गुलाबाला का प्रेमाचे प्रतिक समजले जाऊ लागले हे पाहूयात. गुलाब या फुलाच्या उत्पत्तीचा इतिहास पाहिल्यास त्याला वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे अर्थ असले तरी ते पवित्र गोष्टींशी संबंधित आहेत. ख्रिश्चन धर्माचा सर्वदूर प्रसार होण्याआधी गुलाबाचे फूल देवीदेवतांच्या पुजेसाठी वापरले जायचे. खास करुन ‘अ‍ॅफ्रोडेएट’ म्हणजेच ‘व्हिनस’ (शुक्र) देवीच्या उपासनेसाठी वापरले जात असे.

व्हिनस ही प्रेम, सौंदर्य आणि समाधानाची देवी आहे असे ग्रीक लोक मानतात. ‘कॉन्स्टटाइन’ साम्राज्याने रोममध्येही ख्रिश्चन धर्माचा प्रसार केल्यानंतर 'गुलाब' म्हणजे व्हर्जिन मेरीचे फूल म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवपुराणमध्ये गुलाबाला देव पुष्प म्हटले गेले आहे. ख्रिश्चन धर्माप्रमाणेच इस्लाम धर्मातही गुलाबाला खूप महत्व होते. इराण आणि आजूबाजूच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड मागील काही शतकांपासून होत आहे. त्यामुळे अगदी गझलांपासून ते देवाची स्तुती करणाऱ्या गाण्यांपर्यंत सगळीकडे गुलाबाचा संदर्भ पाहायला मिळतो. सुफी लिखाणात गुलाब आणि प्रेयसीचे तुलनात्मक वर्णन करणारी अनेक काव्य आढळून येतात.

History of Rose
Rose Day : प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला कोणत्या रंगाचा गुलाब द्याल? जाणून घ्या

इराण मध्ये गुलाबाला आधीच प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जात असतानाच नंतरच्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये शेक्सपियर आणि समकालीन लेखक आणि कवींपासून गुलाबाने पाश्चिमात्य साहित्यामध्ये प्रवेश केला. सुफी साहित्याप्रमाणेच येथेही गुलाब आणि प्रेमाच्या नात्याला या कवींनी आपल्या शाईच्या रुपाने खतपाणीच घातले आणि पुन्हा एकदा गुलाब आणि प्रेमाचे नाते नव्याने खुलवले. युरोपमधील काही देशांनी गुलाबाला आपले राष्ट्रीय फूल घोषित केले आहे. पुराणकालीन संस्कृत वाङ्‌मयात गुलाबाला शतदला, लक्ष्मीपुष्पा, पाटल, तरुणीपुष्प, अतिमंजूला आणि सेमांतिका ही नावे त्याला दिलेली आढळतात.

मोगल राजे होते गुलाबाचे चाहते -

जहांगीर बादशहा बेगम नूरजहान यांच्या विवाह प्रसंगी (इ. स. १६१२) गुलाबाच्या अत्तराचा शोध लागला. पुढे मोगलांनी भारतात गुलाबाच्या बागा वाढविल्या. पुढे हाच लिखाणातील गुलाब चित्रपटातुन मालिकांमधुन पुन्हा पुन्हा नव्याने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. त्यामुळेच आता गुलाबाचे फूल म्हणजे प्रेमाचे प्रतिक ही भावना लाखो लोकांच्या मनात पक्की घर करुन बसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com