Rashtriya Swayamsevak Sangh Naming Story
esakal
तारीख होती 27 सप्टेंबर 1925, म्हणजेच विजयादशमीचा दिवस. या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या साक्षीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली होती. आज, हीच संघटना देशातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या 100 वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गावागावांत पोहोचला आहे. आज देशभरात 83 हजारांहून अधिक शाखा आणि लाखो स्वयंसेवक आहेत. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावामागचा इतिहासही रंजक आहे.