हिटलरचा मृत्यू 1945 मध्येच 

पीटीआय
सोमवार, 21 मे 2018

नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा मृत्यू 1945 मध्येच झाला असल्याचे त्याच्या दातावर केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. हिटलरच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क आतापर्यंत लढविले गेल्यानंतर आणि अनेकांनी संशोधन केल्यानंतर फ्रान्सच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

पॅरिस - नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा मृत्यू 1945 मध्येच झाला असल्याचे त्याच्या दातावर केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. हिटलरच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क आतापर्यंत लढविले गेल्यानंतर आणि अनेकांनी संशोधन केल्यानंतर फ्रान्सच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

दुसऱ्या महायुद्धात रशियाने बर्लिनपर्यंत धडक मारल्याने पराभव स्पष्ट दिसताच हिटलरने 1945 मध्ये त्याच्या बंकरमध्ये सायनाईड घेऊन आणि स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. मात्र, काही जणांच्या मते हिटलर नंतरही काही वर्षे जिवंत होता. हिटलरच्या दाताचे तुकडे मॉस्कोमध्ये जतन करून ठेवले आहेत. फ्रान्सच्या संशोधकांनी या दातांच्या तुकड्यावर संशोधन करून हिटलरचा मृत्यू निर्विवादपणे 1945 मध्येच झाल्याचा निर्वाळा दिला आहे. "या संशोधनामुळे आपण आता इतर तर्क लावणे बंद करूया. तो पाणबुडीच्या साह्याने गुप्तपणे अर्जेंटिनाला गेला नाही अथवा अंटार्क्‍टिकावरही लपून बसला नव्हता,' असे या संशोधन पथकातील प्राध्यापक फिलीप चार्लीअर यांनी सांगितले. या पथकाने केलेले संशोधन युरोपीयन जर्नल या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. 

रशियाच्या गुप्तचर संस्थेने 1946 नंतर प्रथमच जुलै 2017 मध्ये हिटलरच्या दाताचा आणि हाडांचा अभ्यास करण्यास परवानगी दिली. संशोधकांना हिटलरच्या कवटीमध्ये छिद्र आढळले. त्याने गोळी झाडून घेतल्याने ते पडले होते. तसेच, त्याने घेतलेल्या सायनाईडचा रासायनिक परिणाम म्हणून त्याच्या दातांवर निळे डाग पडलेले संशोधकांना आढळले.

Web Title: Hitler died in 1945