बंगालमध्ये शाळांना 30 जूनपर्यंत सुटी

यूएनआय
बुधवार, 20 जून 2018

पश्‍चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट पाहता राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांची उन्हाळी सुटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या शाळांना आता 30 जूनपर्यंत सुटी असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट पाहता राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांची उन्हाळी सुटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या शाळांना आता 30 जूनपर्यंत सुटी असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

पश्‍चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी निर्णयाची माहिती दिली. राज्यातील सरकारी शाळा गेल्याच आठवड्यात सुरू झाल्या आहेत. मात्र वाढती उष्णता पाहता आणखी दोन आठवडे शाळांना सुट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: Holidays for schools in Bengal till June 30