Republic Day 2023 : राष्ट्रीय सणाला घर असं सजवून घ्या खास फील Decoration Ideas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day Decoration Ideas

Republic Day 2023 : राष्ट्रीय सणाला घर असं सजवून घ्या खास फील

Republic Day Decoration Ideas: प्रजासत्ताक दिनाला खूप महत्व आहे, भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे, या दिवशी आपले संविधान १९५० पासून अंमलात आलेले.

जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती त्याची आठवण म्हणूनही २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. 

हेही वाचा: Republic Day : २६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण का करणार नाहीत ?

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट सकाळी लवकर उठून शाळेत जाऊन शाळेच पटांगण सजवायचे, फळ्यावरती चित्र काढायचे आणि रांगोळ्या काढायच्या, तुमच्याही अशा आठवणी असतील नाही? मग या आठवणी आता परत क्रिएट करा, आपलं घर छान घर सजवून.  

हेही वाचा: Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकतात. 

republic day home decoration

republic day home decoration

१. वॉल डेकोरेशन: आपल्या घराची एक भिंत निवडा आणि तिला छान सजवा; सजवतांना प्रामुख्याने आपल्या तिरंग्याचे रंग घ्या, अर्थात तुम्हाला आपल्या भिंतीचा रंग बदलायचा नाहीये पण तुम्ही क्राफ्टिंग आयडिया वापरुन काही छान गोष्टी बनवू शकतात. गणपतीच्या वेळेस आणलेल्या फुलांच्या माळा लटकवू शकतात. 

हेही वाचा: Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण का होत नाही? संविधानात दडलं आहे कारण

republic day home decoration

republic day home decoration

२. वॉल हँगिंग: घोटीव कागद वापरुन तुम्ही हे हँगिंग बनवू शकतात. आपल्या भिंतीच्या मध्यभागी सुद्धा तुम्ही हे हँगिंग अडकवू शकतात किंवा बाल्कनीमध्ये किंवा खिडकीजवळ सुद्धा हे छान दिसतील. 

हेही वाचा: Republic Day 2023 : घटनादुरुस्तीच्या 'या' 3 पद्धती तुम्हाला महितीयेत का?

republic day home decoration

republic day home decoration

३. पेन स्टँड आणि इतर वस्तू: तिरंग्याचे डिझाईन असलेले पेन स्टँड किंवा फोटो फ्रेमही तुम्ही बनवू शकतात. हे पेन स्टँड तुम्ही कार्डबोर्डने किंवा जुन्या बाटल्यांच्या मदतीने बनवू शकतात. फोटो फ्रेमसाठीही तुम्हाला फक्त जुनी रद्दी लागेल.

हेही वाचा: Republic Day 2023 : घरी राहून कसा खास बनवाल प्रजासत्ताक दिन?

अशा काही आयडिया वापरून तुम्ही आपलं घर सजवू शकतात, छान कपडे घालून फोटोही काढू शकतात आणि आपल्या देशाबाबत कृतज्ञताही व्यक्त करू शकतात.  

हेही वाचा: Republic Day 2023 : ‘याची देही याची डोळा’ पहायचाय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?; असे बुक करा तिकीट!