Video: जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले श्वानाचे प्राण

वृत्तसंस्था
Thursday, 17 September 2020

एका युवकाने जिवंत भटक्या कुत्र्याला पुलावरून खाली फेकून क्रूरतेचा कळस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी टीका केली होती. पण, अगदी त्याच्या उलट एका जवानाने जीव धोक्यात घालून एका कुत्र्याचा जीव बचावला आहे.

हैदराबाद: एका युवकाने जिवंत भटक्या कुत्र्याला पुलावरून खाली फेकून क्रूरतेचा कळस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी टीका केली होती. पण, अगदी त्याच्या उलट एका जवानाने जीव धोक्यात घालून एका कुत्र्याचा जीव बचावला आहे.

Video: क्रूरतेचा कळस; कुत्र्याला पुलावरुन खाली फेकले

देशातील विविध भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. पुरामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. एक कुत्रा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होता. सुदैवाने त्याला फांदीचा आधार मिळाला. मदतीसाठी तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने त्याचा आवाज फुटत नव्हता. एका होमगार्डच्या जवानाने त्याला पाहिल्यानंतर जीव धोक्यात घालून वाचवायचे ठरवले आणि वाचवलेही. तेलंगणा राज्यातील नागरकुर्नूल परिसरात ही घटना घडली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, जेसीबीच्या साहाय्याने जवान या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याचा वेग जास्त असतानाही जवानाने धाडस करत कु्त्र्यापर्यंत पोहचला आणि त्याला अलगद जवळ घेत पाण्याच्या बाहेर काढले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी जवानाचे कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home guard soldier save dog life from water at telangana video viral