Video: क्रूरतेचा कळस; कुत्र्याला पुलावरुन खाली फेकले

वृत्तसंस्था
Tuesday, 15 September 2020

एका युवकाने जिवंत भटक्या कुत्र्याला पुलावरून खाली फेकून क्रूरतेचा कळस केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाचा शोध घेत आहेत.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने जिवंत भटक्या कुत्र्याला पुलावरून खाली फेकून क्रूरतेचा कळस केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाचा शोध घेत आहेत.

सैराट: 'मला माफ करा, मी माझ्या पतीकडे जातेय'

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवक पुलावर उभा आहे. एका कुत्र्याला उचलून घेतो आणि कॅमेऱ्याकडे बघून हसत-हसत पाण्यात फेकून देतो. फक्त स्वःताच्या मजेसाठी त्याने हा प्रकार केल्याचे पाहायला मिळते. शिवाय, मोठा पराक्रम केल्यासारखा व्हिडिओमध्ये हसताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यासोबत केलेल्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. स्थानिकांनी भोपाळच्या श्यामला हिल्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. प्राणीप्रेमी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत भोपाळच्या जिल्हाधिकाऱयांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, युवकाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस युवकाचा शोध घेत आहेत. पण, या घटनेनंतर कुत्रा जिवंत आहे की नाही याबाबतची माहिती मिळालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth throws dog into lake in bhopal video viral