केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 18 August 2020

काही दिवासांपूर्वीच अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रकृती अस्वस्थामुळे मध्यरात्री उशीराने दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. त्यांना खासगी वार्डमध्ये ठेवण्यात आले असून एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील 3-4 दिवसांपासून त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत स्थिर असून ते रुग्णालयातूनच आपले कामही पाहत आहेत.

आरोग्य विभागाच्या 17 हजार जागा भरणार ; ओरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

काही दिवासांपूर्वीच अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. यावेळी  त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. अमित शहा यांनी खुद्द ट्विटरवरुन यांदसर्भातील माहिती दिली होती. कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या परिस्थितीत आरोग्यासंदर्भात प्रार्थना करणाऱ्या हितचिंतकांचे आणि इश्वराचे आभार मानतो, असा उल्लेख करत त्यांनी रिपोर्ट निगेटटिव्ह आल्याची माहिती दिली होती. काही दिवस घरीच विलगिकरणात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. कोरोनाची पुष्टी झाल्यानंतर उपचार करणाऱ्या मेदांता रुग्णालयातील डॉक्टर आणि येथील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah Admitted in AIIMS in late night

Tags
टॉपिकस
Topic Tags: