Amit Shah : कोणाला घाबरण्याची गरज नाही; अदानी-हिंडेनबर्ग वादावर अमित शहांचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
Amit Shah News
Amit Shah Newsesakal
Summary

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी कोणतीही स्पर्धा नाही आणि देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र यांच्यासोबत मनापासून पुढं जात आहे.

Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीत अमित शाह यांनी पहिल्यांदाच अदानी हिंडेनबर्ग वादावर (Adani Hindenburg Controversy) आपलं मत व्यक्त केलं.

तसंच 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका, PFI बंदी, संसदेतील वाद, अंतर्गत सुरक्षा, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. अदानी प्रकरणावर बोलताना काहीही लपवण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही, असं गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करत शहा म्हणाले, '2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी कोणतीही स्पर्धा नाही आणि देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मनापासून पुढं जात आहे. सरकारच्या अनेक निर्णयांमुळं लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत.'

Amit Shah News
Accident : लग्नाला जात असताना काळाचा घाला; भीषण अपघात पप्पू यादव यांच्यासह अनेक नेते जखमी; कारचा चक्काचूर

आम्ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर यशस्वीपणे बंदी घातली. ही अशी संघटना होती, जी देशातील धार्मिक कट्टरतावादाला प्रोत्साहन देत होती. PFI कडं देशाची एकात्मता आणि अखंडतेच्या विरोधात पुरावे सापडले. आम्ही व्होट बँकेच्या राजकारणाचा विचार न करता पीएफआयवर बंदी घातली, असंही शहा म्हणाले.

Amit Shah News
Cyclone Gabriel : 'या' देशात चक्रीवादळाचा कहर; 40 हजार घरांत वीज पुरवठा खंडित, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

अदानी प्रकरणी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, लपण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. काँग्रेसनं संसदेत सातत्यानं भाजपवर आरोप केले. मात्र, सत्ताधारी पक्षानं पलटवार करत पुरावे दिले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com