
Home Minister Amit Shah emphasizes stronger legal measures to ensure no terrorist remains safe anywhere in India.
Sakal
मानेसर : ‘‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हवाई कारवाईमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची मुख्यालये, प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, आता दहशतवाद्यांसाठी जगात कुठेही सुरक्षित ठिकाण शिल्लक नाही,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हरियाना येथील एका कार्यक्रमात बोलताना केला.